महाराष्ट्रा     जालना     चंदनहिरा


एकाच भौगोलिक प्रदेशातील(शहर,गाव,वा त्याला जोडून असलेली खेडी किंवा जोडून असलेला प्रदेश) एकसारख्या वस्तुंचे उत्पादन करणा-या आणि समान संधी व दबावांना सामोरे जाण्या-या लोकांच्या समुहाला कामगार समुह म्हणतात.एका कारागीर समुहाची व्याख्या करायची झाल्यास, एकाच भौगोलिक प्रदेशातील(अधिक प्रमाणात गावं किंवा खेडयात) हस्तकला किंवा हातमागांच्या वस्तुंचे उत्पादन करणारे घरगुती समुह, अशी करता येईल. एक कारागीर समुह हा नेहमी एका पारंपारिक समुदायाशी संबंधित असतो आणि अशा स्थापित वस्तुंचे उत्पादन करणे हा त्याचा पिढीजात व्यवसाय असतो. आणि काही कारागीर समुह तर शतकांपासुन चालत आलेले आहेत.

चंदनहिरा समुहासंबधी :-

चंदनहिरा येथील कारागीर समुह महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात येतात.

चंदनहिरा येथील कारागीर समुह हे 220 पर्यत कारागीर आणि 20 स्वयं सहाय्ता सामुह तयार करु शकले आहेत आणि ते जास्त कामाच्या दबावाला सामोरे जायला मदत करत आहेत. लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.

धातुची भांडी :-

तांब्याची भांडी हे महाराष्ट्रातील पारंपारीक हस्तकला उत्पादन आहे, या वस्तुंचे उत्पादन अंबरनाथ,ठाणे,कल्याण आणि नाशिक येथे होते. तांब्यांच्या कलाकृतींच्या विस्तृत प्रकारांचे उत्पादन येथे केले जाते, या उत्पादनांमध्ये छिद्रांचा दिपवृक्ष आणि लँप स्टँड, रक्षापात्र, काचेची पकड,पेपर कटर, पिन कुशन आणि तबकं. कलाकृती जसे सजावटीसाठी दाराची मुठ, कि – चेन, कुडत्याला लावायचे शोभेचे बटन आणि साच्याची त्रिमुर्तीची ( हिंदु तीनमुखी देवता शिव, विष्णु आणि ब्रम्हा) या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय बाजारात बहूमुल्य वस्तु चा अधिकार प्राप्त आहे.

मिश्रधातुवर चांदीचे जडाउ काम करण्याच्या कलेला बिदरी म्हणतात. आंध्रप्रदेशातील बिदर येथील कारागिरांनी खुप वर्षांपुवी बिदरहुन औरंगाबादला स्थलांतर केले तेव्हा ही कलाही त्यांच्याबरोबर महाराष्ट्रात आली. सजावटीसाठी केलेले, भिंतीवर लावायचे फलक हे प्रमुख हस्तकला उत्पादन आहे.तथापि तीर्थस्थळी, जसे नाशिकात फक्त पुजाविधीच्या वस्तु जसे देवाची मुर्ती आणि कंकुवाचे करंडे हे चांदीचे बनवत असत पण वाढती मागणी पाहता, इतर वस्तु जसे पानदान, अत्तरदान, गुलाबदान, वाटया, आणि तबक हे सुद्धा आता सूचीमध्ये आहेत.

धातुच्या वस्तु या महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतीक परंपरेशी जोडलेल्या आहेत, महाराष्ट्रातील परंपरेप्रमाणे नववधुला तिचा नविन संसार सुरु करतांना पितळ आणि कांस्य धातुच्या वस्तु भेट म्हणुन देतात. तसेच बहुतेक सर्व प्रमुख मंदिरांमध्ये मुख्य देवतेची चलंती प्रतिमा ही सुद्धा नेहमी पितळेची बनवलेली असते. पुरीमधील सखीगोपाल मंदिरातील मुख्य प्रतिमे मधली, राधेची मोठी पितळेची मुर्ति, गंजम जिल्ह्यातील मंदिरातील प्रतिमा, कृष्ण, राधा, गणेश, गुरुंडी गोपाल आणि लक्ष्मीची प्रतिमा ह्या सगळ्या पितळेच्या बनविलेल्या आहेत. सामान्यतः कारागीरांच्या प्रतिमा ह्या, वेगवेगळे रुपांकनं जसे माणसाचे डोके, राजे मानस, किंवा मोजमापांच्या आधारे छोट्या प्रतिकृती बनवुन केलेल्या असतात; दुस-या वस्तुंमध्ये समावेश आहे झाकणी असलेली कुलुपाची सोय असलेली किंवा नसलेली भांडी, मेणबत्ती स्टँड, रक्षापात्र, पेन स्टँड, वाटया, ताटल्या,चमचे, पेले, गोलबुडाचे फुलपात्र, घंटा, मोठे ताट, हंडी, बालटी, जिना, भांडी आणि कढई, डाव, झारा इत्यादी.इतकेच नव्हे तर गुंनजाम जिल्ह्यातील बेलगुंथा येथील कारागिर पितळेचे मासे आणि सापसुद्धा बनवतात.

कच्चा माल :-

भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासुन, पितळ आणि तांबे धातुचा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु बनविण्यासाठी उपयोग केला जातो आहे. भारतात धातुंच्या वस्तु धार्मिक आणि सामाजिक अशा दोन्ही उद्देशात वापरण्यासाठी बनविल्या गेल्याची एक समृद्ध परंपरा आहे. धातुच्या वस्तुंच्या विस्तृत प्रकारांमध्य़े समावेश आहे, समई, निरांजन, पंचारती, साखळी असलेला दिवा. उथळ गोल, षटकोनी, अष्टकोनी, लंबगोलाकार आकाराचे तबकं इत्यादी जास्त वापरात असलेली आणि बनवली जाणारी जाणारी कास्य किंवा पितळेची उत्पादनं आहेत. लोकप्रिय तंजावर प्लेटवर डिझाईन्समध्ये विशेषतः देवीदेवतांच्या, पक्षांच्या, फुलांच्या आणि भुमितीय आकृत्या आढळतात. या आकृत्या तांबे किंवा चांदीच्या थराला मागुन ठोकुन बाहेर काढल्या जातात आणि त्याचवेळी त्या आकृत्या पितळेच्या तबकावर, कुडाम किंवा पंचपात्रावर आवरणासारखी बसवली जातात. धातुची खेळणीसुद्धा लोकप्रिय आहेत आणि ती राज्याच्या वेगवेगळ्या गावं आणि शहरांच्या भेटवस्तुं मिळणा-या दुकानात विकली जातात.

प्रक्रिया :-

कारागीर रेती, राळ व तेल प्रमाणात (20: 2: 1)घेउन वस्तु बनविण्यासाठी स्वतःचे मातिचे साचे बनवतात. आणि मातीच्या पृष्ठभागावर धातु चिकटायला नको म्हणुन बोरँक्स टाकतात. गडद जस्त हा तांबे व जस्त यांचा मिश्रधातु आहे. यात जस्त हा आधारभुत घटक असतो (जस्ताचे प्रमाण तांब्याच्या 9 ते 16 पट असते). या मिश्रधातुला वितळवुन साच्यामध्ये ओतल्या जाते आणि नंतर घनरुपात आणले जाते.

घडविलेल्या कलाकृतीचा खडबडीत पृष्ठभागाला सँड पेपरने घासुन चिकण आणि मउ केले जाते. आणि नंतर त्यावर काँपर सल्फेटचे मिश्रण चोळले जाते जाते, जेणेकरुन एक गडद पृष्ठभाग तयार होउन नंतर डिझाईन काढायला आणि कोरण्याची प्रक्रिया सुलभ रीतीने व्हायला मदत होईल.

डिझाईन कोरायला मधमाशीच्या पोळ्यापासुन मिळालेले मेण आणि राळ हे बांधणारे घटक वापरतात. हे मिश्रण एका सपाट दगडावर पसरवतात आणि जी वस्तु बनवायची आहे ती त्यावर घट्ट बसवतात. हाताने ट्रेस केलेल्या डिझाईनच्या खाचेमध्ये छन्नीच्या साहाय्याने ९५% शुद्ध चांदीच्या तारेने जडवण्याचे काम करतात. पाच वेगवेगळ्या प्रकारची साधने कोरीवकाम करायसाठी वापरतात.

प्रक्रियेच्या सगळ्यात मनोरंजक चरणात वस्तुंना हळु हळु गरम करुन त्याच्यावर साल – अमोनीक आणि जुन्या किल्याच्या इमारतीहून आणलेली माती यांचे मिश्रण लावले जाते, त्यानी वस्तुच्या पृष्ठभागाला एक गडद काळा रंग प्राप्त होतो आणि काळ्यावर अगदी विरुद्ध रंगात चमकणारे चांदीचे जडाउ काम अजूनच उठुन दिसते.

आजवर अन्य कोणत्याही धातुंच्या वस्तुंना कदाचित न मिळु शकलेले अद्वितीय स्थान बिदरी या जडाउ कामाला मिळाले आहे, आणि त्यात ह्या विरोधी रंगसंगतीचे एक फार मोठे योगदान आहे. वस्तु तयार झाल्यावर, काळ्या रंगाच्या चमक नसलेल्या कोटिंगला अजुन डार्क रंगाची करायला शेवटी त्याला तेल लावले जाते. ही सगळी प्रक्रिया हाताने केली जाते म्हणुन हे वेळखाउ काम आहे.

तांत्रिक बाबी :-

डिझाईन चे स्तर औद्योगिक असो किंवा मूर्तीकलेशी संबधीत असो किंवा इतकेच काय एक छोट्या स्तरावर एक अंगठी किंवा कानातले बनवतांना असो धातुचे म करायच्या पद्धती या समान प्रकारच्या नियमाचे पालन करतात. याच बरोबर पुष्कळशा आधारभुत पद्धती यासुद्धा इतर क्षेत्रातील कामांशी संबधीत आहेत.

जडाउ काम :- या पद्धतीमध्ये सोल्डरींग किंवा ग्रानुलटिंग करुन एका धातुच्या चादरीवरचे आकार कापुन दुस-या धातुच्या पृष्ठभागावर लावुन डिझाईन तयार ले जातात.

साच्याने वस्तु तयार करणे :- या पद्धतीत धातुला वितळुन साच्यात टाकुन आकार दिल्या जातो.

उत्कीर्णन कला :- ह्या पद्धत धातुच्या पृष्ठभागाच्या आत प्रभावी नोकदार उपकरण घालुन सजावटीचे शेवटचे काम केले जाते.

मीनाकारी :- एक द्रवरुपातील काचेसारखा पदार्थ धातुवर लावतात. मीनाकाम हे द्रव आणि धातुंचे आँक्साइड( रंगासाठी) यांना एकत्र करुन करतात. क्लोईझोने ही माहिती असलेली एक अधिक चांगली मीनाकामाची पद्धत आहे.

रिपौझी :- या पद्धतीत धातुला पाठिमागुन हतौडीने ठोकुन आणि ढकलुन समोर पृष्ठभागावर उठाव निर्माण केला जातो आणि एक डिझाईन तयार केले जाते.

जायचे कसे :-

जालना गांव हे राज्याची राजधानी आणि राष्ट्राची राजधानी यांना ब्राँड गेज रेल्वेमार्गाने जोडलेले आहे.राज्यातील प्रमुख शहरंसुद्धा राज्यमहामार्गाने जोडलेले आहेत.








महाराष्ट्रा     जालना     भारत विकास बहुउद्दशिय संस्था