महाराष्ट्रा     नागपुर     अमरावती


एकाच भौगोलिक प्रदेशातील(शहर,गाव,वा त्याला जोडून असलेली खेडी किंवा जोडून असलेला प्रदेश) एकसारख्या वस्तुंचे उत्पादन करणा-या आणि समान संधी व दबावांना सामोरे जाण्या-या लोकांच्या समुहाला कामगार समुह म्हणतात.एका कारागीर समुहाची व्याख्या करायची झाल्यास, एकाच भौगोलिक प्रदेशातील(अधिक प्रमाणात गावं किंवा खेडयात) हस्तकला किंवा हातमागांच्या वस्तुंचे उत्पादन करणारे घरगुती समुह, अशी करता येईल. एक कारागीर समुह हा नेहमी एका पारंपारिक समुदायाशी संबंधित असतो आणि अशा स्थापित वस्तुंचे उत्पादन करणे हा त्याचा पिढीजात व्यवसाय असतो. आणि काही कारागीर समुह तर शतकांपासुन चालत आलेले आहेत.

अमरवती मधील कारागीर समुहासंबधी:-

अमरावतीतील कारागीर समुह हे महाराष्ट्रातील नागपुर जिल्ह्यात येतात.

अमरावती जिल्ह्यातील कारागीर समुह हे 240 पर्यंत कारागिर आणि 20 स्वयं सहाय्ता सामुह तयार करु शकले आहेत आणि ते जास्त कामाच्या दबावाला सामोरे जायला मदत करत आहेत. लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.

दागिने :-

आजच्या काळात सोने, चांदी, आणि मौल्वान खडे यांच्या गगनाला भिडलेल्या किंमतींचा विचार करता, हाडं आणि शिंग यांच्यापासुन बनविलेल्या सुंदर दागिन्यांची लोकप्रियता फक्त उत्तरप्रदेशाच्या काही भागातच नाही, तर विदेशातसुध्दा दिवसेंदिवस वाढते आहे. "पुर्वी यांची मागणी इतकी जास्त नव्हती पण आता आम्हाला विदेशातुनसुद्धा मागणी येते आहे, आणि ही मागणी पुर्ण करण्यासीठी आम्ही आमच्यापरीने सर्वोतोपरी प्रयत्न करतो आहोत". असे भुवेशकुमार या हाडांचे दागिने बनविणा-या कारागीराने सांगितले. ह्या स्वदेशीय हस्तकला कारागीरांना हाडांच्या वस्तु आणि साहाय्यक सामुग्री, तसेच अलंकार बनविण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य वंशानुगत रुपाने प्राप्त आहे आणि ही कला त्यांच्या पुर्वजांपासुन चालत आलेली आहे.

"स्वातंत्रपुर्व काळी लोक हाड आणि शिंग यांपासुन बनविलेले कंगवे वापरीत. त्या काळाच्या आधीपासुन कारागीर कोरीव काम करत होते आणि या कलेची परंपरा पिढ्या न पिढ्या हस्तांतरीत होउन चालत आलेली आहे, " असे मुरादाबाद येथील हाडांच्या दागिन्यांची निर्यात करणा-या राजीव गुप्ता यांनी सांगितले. हाडांच्या बांगडया व्यक्तिगत आवड आणि पसंती यानुसार वेगवेगळ्या त-हेचे डिझाईन्स आणि रंगामध्ये उपलब्ध आहेत.

वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असलेल्या हाडांच्या दागिन्यांची नियमित मागणी विदेशातील महाविद्यालयीन विद्यार्थांमध्ये सतत आहे. दागिन्यांच्या वेगवेगळ्या लक्ष वेधुन घेणा-या रंगसंगती विदेशी भुमीतील ग्राहकांना भुरळ घालतात. " जनावरांच्या हाडं आणि शिंगांपासुन बनविलेल्या विस्तृत प्रकारच्या वेगवेगळ्या रंगाच्या दागिन्यांनमुळे आम्हाला हातभरभरुन लाभ मिळतो आहे. कोणत्याही प्रकारचे दागिने असो आम्ही त्याला सहजतेने वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटांमध्ये रंगवितो. नाविन्यपुर्ण रंगसंगती आंतरराष्ट्रीय ग्राहकांना आकर्षित करतात. ते त्यांच्या वेशभुषेला मँच करणारे दागिने खरेदी करतात, " असे मनोज या हाडांचे दागिने तयार करणा-या कारागिराने सांगितले. ( एएनआय)

कच्चा माल :-

दागिन्यांच्या कलाकृती बनविण्यासाठी आवश्यक असणारा मुलभूत कच्चा माल आहे -:

मुलभूत सामुग्री :- शिंपले, लाख, शंख, तांब्याच्या किंवा लोखंडाच्या बांगडया, चंदेरी पितळ, सामान्य धातू, फुलांच्या रचना, चंदेरी पितळ, सोने, खार किंवा नवसागर, कोळसा, मेण, राँकेलचा दिवा, अँल्युमिनियम धातू, लाकडी साचा, हतोडी, मोगरी, कोरणी,कतरणी,धातु किंवा लाकडाला कापण्यासाठी स्क्रायबर, तारेची कात्री, लोखंडी आणि ब्राँझ चे डाय केलेले मोठे मणी, प्रवाळ मोती, रेशमी धागा,मणी, पाँलीश इत्यादी वस्तु.

सजावटीची सामुग्री :- काचेचे मणी, धातूचे मणी आणि काळे मणी

रंगीत सामुग्री :- सोडियम सल्फेट, तुरटी मिठ, सल्फ्युरीक अँसिड, रंग, डिंक, वारनिस, एनामेल रंग.


प्रक्रियाः-:

मनाला स्फुरलेल्या दागिन्याच्या आकृतीला वास्तवात बनविण्याचा विचार करतांना दागिने बनविण्याच्या प्रक्रियेत सहभाग असलेल्या क्रमबद्ध पाय-यांचे पालन करावे लागेल :

(a) कंप्युटरच्या साहाय्याने काढलेल्या चित्राचे निगटिव्ह तयार करा.

(b) एका कठिन पृष्ठभागावर एका फोटोपाँलिमरायझेबल राळेला बिछवुन निगेटिव्हनी आच्छादित करा.

(c) अतिनिल किरणोत्सर्गाने न झाकल्या गेलेल्या राळेवर प्रक्रिया करा.

(d) पाँलिमरायीझ न झालेल्या राळेला फोटोपाँलिमर वरुन पाण्याने धुवुन काढुन टाका, या प्रक्रियेच्या परीणामस्वरुप तुम्हाला निर्माण होणा-या वस्तुची त्रि-मितीय आकृती मिळेल.

(e) मिळालेल्या कोरीव राळेच्या प्लेटला एका भांड्यामध्ये ठेवुन आणि त्याच्यावर साधन राळेला ओता त्याच्यामुळे दागिन्याचे एक उलटे प्रतिबिंब असलेली छाप तयार होईल.

(f) राळेचा प्लग दागिन्यांच्या साच्याशी जोडला असता एक दागिना घडविणारा रिकामा साचा तयार होईल.

(g) पुर्ण तयार झालेल्या साच्यात प्लास्टीक भरले असता दागिन्याचा एक प्लास्टीकचा नमुना तयार होईल.

(h) प्लास्टीकच्या नमुन्याला मेणात बुडवुन साचा ढालण्याच्या प्रक्रियेने एक विशिष्ठ दागिना प्रकार तयार करतात.

तांत्रिक बाबी :-

धातुमध्ये आपोआप उभार आणि दरी निर्माण होवुन एक अप्रतिम डिझाईन तयार करण्याच्या प्रक्रियेला रेटिक्युलेशन म्हणतात. खरी चांदी किंवा रेटिक्युलेशन चांदीला वितळण बिंदु पेक्षा थोडी कमी उष्ण्ता देउन खुप वेळा गरम केले जाते, नंतर शेवटी नरम चांदी पृष्ठभागावर दिसते, जिला हलवता आणि मोडता येते. चांदी किंवा सोनं यांच्या दोन तुकडयांना जोडण्यासाठी सुध्दा, उष्णता देउन वितळवण्याची ही प्रक्रिया वापरली जाते,यात दोन तुकडयांचे पृष्ठभाग जवळ आणुन उष्णता देवुन वितळवले जातात आणि नंतर जोडतात. यासाठी सोल्डर वापरले जात नाही. जपान मधील मोकुमे - गाने, म्हणजे लाकुड धान्य धातु. एकानंतर एक अश्या शुद्ध चांदी आणि तांबे किंवा शुद्ध चांदी आणि 22 कँरेट सोनं यांचे एकावर एक थर ठेवुन एकत्र बांधले जातात. नंतर त्यांच्या पृष्ठभागाला वरुन ठोकतात किंवा वाकवतात आणि नंतर डिझाईन दिसण्यासाठी त्यांना तासतात. अनियमित डिझाईनच्या थरांना एक शुद्ध  चांदीचा साहाय्यक टेकु असतो.दोन तुकडे कधीही एकसारखे नसतात. टायटेनियम धातुला टायटेनियम रंग देण्यासाठी त्या धातुला विशिष्ठ वोल्टेजवर एनोडाइज करतात, म्हणजेच आँक्साइड चे थर देतात. हे थर प्रकाशाचे वेगवेगळ्या रुपात अपवर्तन करतात - प्रकाशाचा एक परिणाम जो डोळ्यांना इंद्रधनुश्याच्या रंगासारखा दिसतो. अशाप्रकारे ही, धातुच्या पृष्ठभागावर आँक्साइड चा चांगला थर देउन त्याला पुर्णत: रंगबिरंगी करण्याची पद्धती आहे. शिबुइची; हा एक शुद्ध चांदी आणि तांबे यांनी बनलेला मिश्रधातु आहे. चीन मधिल हँन राजवटीमध्ये याचा पहिल्यांदा वापर झाल्याचा, माहिती असलेला उल्लेख आहे. कोरु; हे डिझाईन भरभराट आणि जिवन दर्शवणारे, न्युझिलंड मधिल माओरी भाषा बोलणा-या संप्रदायाचे पारंपारिक चिन्ह आहे.ते एक तारुण फर्न झाड दर्शवते.तसेच शांती, मधुर संबध आणि नविन सुरवात याचे प्रतीक आहे.

जायचे कस :-


हवाईमार्ग:-


मधुर संबध आणि नवीन सुरवात याचे प्रतीक आहे.सोनेगाव हे देशांर्तगत विमानतळ, शहराच्या मध्यभागापासुन फक्त 6 किमी लांब आहे.

 

रस्तामार्गे:-


हे शहरसुद्धा सर्व प्रमुख शहरांशी रस्ते मार्गांनी जोडलेले आहे. अमरावती शहराला नियमित सराकारी परिवाहन बसेसनी नागपूर, वर्धा, अकोला आणि इतर शहरांशी जोडलेले आहे.

 

रेल्वेमार्गे:-

 

मध्य रेल्वे मार्गावर, मुंबईपासुन 673 किमी दुर, अमरावती हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. तुम्हाला अमरावतीला जाण्यासाठी, मुंबई, वर्धा, आणि नागपूरहून थेट रेल्वेगाडया मिळु शकतात.








महाराष्ट्रा     नागपुर     दलित मुस्लीम मागासवर्गीय युवा फेडरेशन